रावेरमध्ये महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्सव समितीची स्थापना अध्यक्षपदी विनोद उर्फ शिवाभाई कोळी; विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे नियोजन

    रावेर : दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे रावेर शहरात आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्साहात, दिमाखात व भव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी अंतिम नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत जयंती उत्सवाच्या विविध कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आध्यात्मिक दिंडी सोहळा तसेच महर्षी वाल्मिकी व्याख्यान सोहळा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.

   या बैठकीत ‘आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्सव समिती–२०२६’ ची स्थापना करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी विनोद उर्फ शिवाभाई कोळी (पुनखेडा) यांची निवड करण्यात आली.

समितीच्या उपाध्यक्षपदी शरद कोळी (आंदलवाडी), सुभाष सपकाळे (सुनोदा), ईश्वर तायडे (गोलवाडा) यांची, तर सचिवपदी भूषण तायडे (रावेर) आणि सहसचिवपदी संतोष कोळी (गाते) यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी योगेश्वर कोळी (तांदलवाडी), तर सहखजिनदारपदी गोपाल कोळी (खिरवड) यांची निवड झाली.

सल्लागारपदी चंद्रकांत कोळी (पुरी), सदाशिव कोळी (उदळी), हरलाल कोळी (कांडवेल), दत्तात्रय तायडे (तांदलवाडी), संतोष अप्पा कोळी (सिंगत), आत्माराम कोळी (धामोडी) यांची निवड करण्यात आली.

सदस्य म्हणून विजय कोळी (अजनाड), विनोद कोळी (नेहता), संदीप महाले (निंभोरा), दीपक तायडे (लहान वाघोदा), सुपडू मोरे (थोरगव्हाण), कैलास कोळी (कांडवेल), गणेश सपकाळे (सुनोदा), विक्की कोळी (चोरवड), शुभम कोळी (निबोल), बाळू कोळी (वाघाडी), अतुल कोळी (मांगलवाडी), विजय सपकाळे (सुनोदा), किरण कोळी (अटवाडे), समाधान कोळी (पातोंडी), अशोक कोळी (लहान वाघोदा) व जयराम कोळी (ऐनपूर) यांचा समावेश करण्यात आला

जयंती उत्सवातील विविध कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी श्री. ब्रिजलाल तुकाराम तायडे यांची निवड करण्यात आली. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीचे नियोजन आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्था तथा कोळी समाज संस्था यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन मनोहर कोळी यांनी केले, तर आभार सुभाष सपकाळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!