अमळनेर : महाराष्ट्रातील २००५ बॅचचे अत्यंत धडाकेबाज, प्रामाणिक आणि कडक शिस्तीचे आयएएस (IAS) अधिकारी, तसेच ‘रियल सिंघम’ व युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त आदरणीय श्री. तुकाराम मुंढे साहेब यांची मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृह येथे एक विशेष ‘ग्रेट भेट’ घेण्यात आली. अमळनेर पंचायत समितीचे माजी सभापती तथा पशुधन पर्यवेक्षक डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील (रा. मांडळ) यांनी ही भेट घेऊन त्यांना अमळनेर येथे येण्याचे आदरपूर्वक निमंत्रण दिले.

