अग्निवीर प्रशिक्षणामुळे युवकांमध्ये देशभक्तीची भावना बळावेल ……माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे प्रतिपादन; नवल नगर येथे प्रशिक्षणास प्रारंभ

    धुळे : अग्निवीर भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांमध्ये शारीरिक क्षमता, मानसिक तयारी, शिस्त आणि देशसेवेची भावना निर्माण होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा शिक्षण महर्षी नानासाहेब विजय नवल पाटील यांनी केले.

     कुस्ती क्षेत्राशी संबंधित कार्यरत महिला कुस्तीपटूंच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्न क्रांतिवीर नवलभाऊ महाविद्यालय, नवल नगर तसेच ग्रामविकास मंडळ, नवलनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अग्निवीर भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

    महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना अग्निवीर भरतीचे महत्त्व, भरती प्रक्रिया तसेच त्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक व मानसिक तयारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अग्निवीर भरतीकडे केवळ रोजगाराची संधी म्हणून न पाहता देशसेवा आणि राष्ट्र रक्षणाची संधी म्हणून पाहावे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी यावेळी केली.

     देशातील नागरिकांनी अग्निवीर संकल्पनेचे महत्त्व समजून घेण्याची गरज असून, युवकांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवनशैली आणि योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

     कॅप्टन डॉ. शशिकांत खलाने जयहिंद महाविद्यालय मानसशास्त्र विभाग प्रमुख छत्रसेना अधिकारी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,देशाच्या सुरक्षेसाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. उभाळे होते, तर आयोजक म्हणून प्रा. डॉ. श्रीम. एस. ए. निकम होते. प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरकुंड डॉ. भूषण भदाणे,तसेच ज्येष्ठ विधिज्ञ, अमळनेर डॉ. एस. एन. ब्रम्हे उपस्थित होते.

      यावेळी प्रा. डॉ. एन. झेड. पाटील, डॉ. एस. जे. पाटील, डॉ. ए. बी. सोनवणे, श्रीमती छाया पाटील, डॉ. के. डी. बागुल, डॉ. एस. के. कदम, प्रा. विजय शिंदे, प्रा. विशाल चव्हाण, संभाजी पाटील, रवींद्र धनगर, रोहिदास पाटील, योगेंद्र राजपूत, संजय पवार, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. डी. सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मनोहर ठाकरे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्रशिक्षणार्थी आणि नागरिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!