गणेश उत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत पोलिस प्रशासनास सहकार्य करावे – उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते 

     अमळनेर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुका वेळेत,शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी शहरातील सर्व गणेश उत्सव मंडळांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या वतीने करण्यात आले आहे.

     गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिक मिरवणुकीत सहभागी होत असल्याने वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

    मिरवणुकीत अनावश्यक गर्दी, ध्वनिप्रदूषण, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचे नियोजन तसेच अनुचित प्रकार टाळावेत. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वयंसेवकांच्या माध्यमातून शिस्त राखण्यास मदत करावी. विसर्जन मिरवणुकीचा मार्ग, वेळ आणि प्रशासनाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सवाची परंपरा शांतता व बंधुभावाच्या वातावरणात जोपासावी.

    ‘गणरायाला भावपूर्ण निरोप देताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करणे ही प्रत्येक गणेश मंडळाची जबाबदारी आहे,’ असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!