अमळनेर: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, अमळनेर उपविभागात शालेय बस चालकांची अचानक मद्यपान तपासणी मोहीम राबवण्यात आली. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे (जळगाव) आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते (चाळीसगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनायक बाजीराव कोते यांनी ही धडक कारवाई केली.

सकाळीच लागला तपासणीचा धडाका
दिनांक २५ जून २०२६ रोजी सकाळी ०८:०० ते १२:०० या वेळेत अमळनेर, पारोळा आणि एरंडोल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य चौक व शाळांच्या जवळ थांबून ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान शाळांच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस थांबवून चालकांनी मद्यपान केले आहे की नाही, याची ‘ब्रेथ ॲनालायझर’ मशीनद्वारे जागेवरच तपासणी करण्यात आली.एकूण ३६ वाहनांची तपासणी; सुदैवाने एकही दोषी नाही

या धडक मोहिमेत उपविभागातील एकूण ३६ वाहने तपासण्यात आली. यामध्ये:
अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील: ११ वाहने
पारोळा पोलीस स्टेशन हद्दीतील: १३ वाहने
एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीतील: १२ वाहने
नियम न पाळल्यास कडक कारवाईचा इशारा
शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम यापुढेही नियमितपणे राबविली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यासोबतच पोलीस प्रशासनाने सर्व शाळा प्रशासन आणि पालकांना खालील आवाहन केले आहे:
वैद्यकीय प्रमाणपत्र व चारित्र्य पडताळणी: पालकांनी व शाळांनी आपल्या बस चालकांचे वेळोवेळी वैद्यकीय प्रमाणपत्र आणि चारित्र्य पडताळणी (Police Verification) करून घ्यावी.
महिला मदतनीस बंधनकारक: शालेय बसमध्ये महिला मदतनीस (Female Attendant) असणे अत्यंत बंधनकारक आहे.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर किंवा हलगर्जीपणा करणाऱ्यांवर पोलिसांकडून अत्यंत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अमळनेर उपविभाग यांच्यातर्फे देण्यात आला आहे.
