जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: विमानतळ परिसरातील घरफोडीचा छडा; आंतरराज्य टोळी जेरबंद

     जळगाव: जळगाव शहरातील विमानतळ (एअरपोर्ट) परिसरातील तारा बिझनेस पार्क भागात झालेल्या मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका आंतरराज्य टोळीला बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून सुमारे ११ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नेमकी घटना काय?

      तारा बिझनेस पार्क भागातील रहिवासी आणि ‘रुबी कंपनी’चे मालक मोईज अब्बाज बोहरा हे १३ एप्रिल २०२६ रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. १६ एप्रिल रोजी पहाटे जेव्हा ते घरी परतले, तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला आणि घरातून मोठी चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(१), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अतिशय दुर्गम भागातून आरोपींना अटक

    गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले होते. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे, पोलीस पथकाला समजले की आरोपी मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात लपलेले आहेत.

     पोलीस पथकाने चाचरीया पाटी, सेंधवा आणि खरगोन परिसरात वेशांतर करून अत्यंत कौशल्याने सापळा रचला आणि सहा संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेले आरोपी:

१. निलेश उर्फ भुन्या माहेरिया डुडवे (वय – रा. धावडा)

२. ताराचंद पठाण सोलंकी

३. सायसिंग राकेश सोलंकी

४. रविंद्र छोटू आर्य

५. दिलीप मंगा डुडवे

६. ग्यारशीलाल मगन अलावे (सर्व राहणार चाचरीया पाटी, जि. बडवानी, मध्य प्रदेश)

पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

सोन्याचे दागिने व लगड: ५,४७,५०० रुपये किमतीचे (३९ ग्रॅम)

चांदीचे दागिने: २५,००० रुपये किमतीचे (१९ ग्रॅम)

रोख रक्कम: ५,७८,००० रुपये (भारतीय चलनी नोटा)

एकूण किंमत: ११,५०,५०० रुपये

तपास पथक

      ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि त्यांच्या शोध पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!