अमळनेर : आगामी ईद आणि गुढीपाडवा या हिंदू मुस्लिम सणांच्या दृष्टीने शहरात सामाजिक सलोखा कायम रहावा याकरिता कोणीही आक्षेपार्ह लिखाण अथवा स्टेट्स सोशियल मीडियावर व्हायरल करू नये, असे करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल, अशी ताकीद अमळनेर डीवायएसपी विनायक कोते व परिक्षाविधींन डीवायएसपी केदार बारबोले यांनी दिली आहे.
काल सायंकाळी शहरात एका व्यक्तीचे स्टेटस ठेवण्यावरून किरकोळ वाद झाला.मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे झालेला गैरसमज वेळीच दूर करण्यात आल्याने शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळाले.
शहरातील शांतता कायम रहावी व येणाऱ्या हिंदूंचा गुडी पाडवा व मुस्लिमांचा ईद हा सण नागरिकांना भयमुक्त तथा आनंदात साजरा करता यावा म्हणून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अश्या प्रसंगी कर्तव्यात कसूर नकरता दंगलखोरांची भाड नठेवणाऱ्या पोलीस खात्यातील निर्भीड अधिकारी म्हणून अमळनेरकरांनी अनुभवलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम यांनी शहरातील कायदा सुव्यस्थेचा जायजा घेऊन डीवायएसपी विनायक कोते व परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांना योग्य सूचना देऊन समाजकंटक यांच्या वर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
तसेच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी देखील घटनेबाबत आढावा घेऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
आक्षेपार्ह स्टेटस ठेऊन दोन समाजात गैरसमज पसरवून शहरात अशांतता निर्माण करू इच्छिणाऱ्या दंगेखोर प्रवृत्तीच्या नांग्या ठेचल्या शिवाय राहणार नाही व अशा व्यक्तींवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा डीवायएसपी विनायक कोते , परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी दिला आहे.
दरम्यान शहरात पसरणाऱ्या अफवांवर सुज्ञ नागरिकांनी विश्वास नठेवता अधिकृत जबाबदार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून घटनेची सत्यता समजून घ्यावी व आपल्याला लाभलेल्या संत व क्रांतिकारकांचा वारसा जपावा म्हणून शहर पत्रकार व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने आवाहन केले आहे.
