अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर महसूल ची कारवाई.. मोठ्या वाळू माफियांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

अमळनेर येथील,तालुक्यात सर्रास वाळू उपसा व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागल्याने महसूल विभागाने थातुरमातुर कारवाई केल्याने नागरिक नाराज असून दिवस रात्र अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डँपर वर कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सविस्तर वृत्त असे की,सडावन कन्हेरे येथे एक अनधिकृत गौण खनिज वाळू वाहतूक करणारे टेम्पो आढळल्याने ते पकडण्यात आले. सदर टेम्पो मुद्देमालासह पोलिस स्टेशन अमळनेर येथे जमा करण्यात आले.

या पथकात अमळनेर ग्राम महसूल अधिकारी ए.बी. सोनवणे,अशफाक पिंजारी,मंगरूळ तलाठी प्रसाद पाटील,निंभोरा तलाठी परवर तडवी,अमळनेर शहर
मध्य तलाठी अदिती जरे, जानवे तलाठी राजेंद्र बारी ,पळासदडे तलाठी राजेंद्र केदार , डांगर बु.तलाठी दीपक
पाटील यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!