धुळे येथील आझाद नगर पोलिसांनी बनावट नोटा विक्री करणाऱ्या व्यक्तीचा शिताफीने मुसक्या आवळल्या आहे.
सविस्तर वृत्त की, दि १५/০३/२०२५ रोजी दुपारी २.२५ वाजेचे सुमारास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना गोपनिय बातमी मिळाली की, पोलीस स्टेशन हद्दीतील आग्रा रोड पारोळा चौफुली परिसरात एक ईसम संशयीत रित्या फिरत आहेत व त्याचेकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा असण्याची शक्यता आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने कारवाई करण्याबाबत सपोनि विजय ठाकर यांना आदेशीत केल्याने त्यांचे पथकातील पोहेकॉ गौतम सपकाळे, पोहेकॉ योगेश शिरसाठ,पोहेकॉ संदीप कढरे, पोहेकॉ शांतीलाल सोनवणे, पोहेकॉ रफीक पठाण,पोहेका विजय शिरसाठ,पोहेकॉ योगेश शिंदे, पोकॉ अनिल शिंपी, पोकॉ मक्सुद पठाण, पोकॉ पंकज जोंधळे,चापोकॉ प्रशांत पाटील यांनी पोलीस
स्टेशनचे शासकीय वाहन क्रमांक एम एच १२ एस क्यु २०१६ चालक पोकॉ/ १०३१ पाटील असे पोलीस स्टेशन येथून रवाना होऊन साधारण साय ६.०० वाजेचे सुमारास मुंबई आग्रा हायवे क्र.३ पारोळा चौफुलीच्या पुढे मुंबई पंजाब ढाब्याजवळ शोध घेत असतांना एक संशयीत इसम हा पोलीसाचे वाहन पाहून मुंबई पंजाब ढाब्याच्या आत जाताना दिसल्याने तसेच त्याचा संशय आल्याने पोलिसांनी वाहन थांबवुन ढाब्याच्या आत जावृून सदर इसमाचा शोध घेतला असता तो हॉटेलच्या एका टेबलाजवळ खुर्चीवर बसलेला दिसल्याने सदर
इसमाजवळ जावून पोलिसांनी त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव-दिलीप अलमा
पावरा वय ४१ वर्ष रा.न्यू बोराडी ता शिरपुर जि धुळे असे सांगितले. पोलिसांनी त्याचे पॅन्टीच्या खिशात काय आहे याबाबत विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्याची झडती घेतली असता त्याचे पॅन्टीच्या खिशात हुबेहुब भारतीय चलनाच्या १००,२०० व ५०० च्या एकूण २५,९०० रुपयाच्या ५४ बनावट चलनी नोटा दिसून आल्याने त्याला ताब्यात घेऊन सदर आरोपीतास आझादनगर पोलीस स्टेशन धुळे गुरनं.६२/२०२५ भारतीय न्याय सहिंता कलम १८০ मध्ये अटक करण्यात आली असून आरोपीतास मा न्यायालयाने दिनांक १९/०३/२०२५
रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूुर केलेला आहे.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, पोलीस उप अधीक्षक राजकूमार उपासे यांनी केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे आझाद नगर पोस्टेचे
पोनि.निवृत्ती पवार यांनी आपल्या सहकारी अधिकारी सह कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
