अमळनेर येथील एमपीडीएतून सुटून आलेल्या विशाल चौधरी याच्यावर धुळे रोड वरील बाजार समिती आवारात केलेल्या हल्ल्यातील एकाला पकडण्यात पोलिसांना पकडण्यात यश मिळाले.

सविस्तर वृत्त असे की,दि 3 रोजी एमपीडीएतून सुटून आलेल्या विशाल चौधरी याच्यावर धुळे रोड वरील बाजार समिती आवारात काही अज्ञात लोकांनी प्राणघातक हल्ला करून पळ काढला होता. दरम्यान जखमी विशाल दशरथ चौधरी याला पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवले होते. त्याने दवाखान्यातून दिलेल्या जबाब नुसार दि ३ रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास बाजार समिती आवारातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जवळ उभा असताना विजय सुरेश शिंगाणे , प्रीतम हिरालाल शिंगाणे , दीपक हिरालाल शिंगाणे ,दीपक शांताराम ढोके , गणेश बापू शिंगाणे , दिनेश गायब शिंगणे यांनी कुरापत काढून याला आज सोडायचे नाही म्हणून दमबाजी सुरू केली.त्यातील गणेश शिंगाणे याच्या हातातील धारदार शस्र विजय याने घेऊन विशाल च्या डोक्यावर मारन गंभीर जखमी केले.विशाल खाली पडताच दीपक याने हातातील चाकूने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केली. त्याचवेळी दीपक याच्या हातातील लोखंडी रॉड,दीपक ढोके व दिनेश यांनी हातातील लाठ्या काठ्यानी पायावर मारहाण केल्याचे पोलिसांना जबाणीत सांगितले. दरम्यान पोलीसानी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
विशाल चौधरी यानी दिल्या जबाब वरून सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता १०९ , १८९(२) ,१९१(२),१९१(३),१९० ,११५ ,३५१(२),३५२,१३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.
