अमळनेर येथील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव पालकांसह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या दहा वर्षां पासून क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा कौशल्यांचे प्रदर्शन करतात.यंदाही या क्रीडा महोत्सवाचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात आले. या
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी सचिव प्रा. श्याम पाटील, संचालक , पराग पाटील, प्राचार्य डॉ. नीरज चव्हाण व विशेष अतिथी उपस्थीत होते.
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे २ रीच्या विद्यार्थ्यांच्या फुटबॉल मॅचने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले , याला उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार पाठिंबा दिला. पालकांनी देखील या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच पालकांनी देखील त्यांच्या साठी ठरवलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला.
सदर क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या क्रीडा शिक्षिक केदार देशमुख, सागर चावरिया आणि रमेश धनगर यांनी व्यवस्थापनासाठी मेहनत घेतली.
या अकराव्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा समारोप सर्व विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिक मेडल्स प्रदान करून झाला.
