अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात आज प्रसिद्ध लेखक व विचारवंत अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की,आज दि4 फेब्रुवारी रोजी प्रताप महाविद्यालयात “उद्याचा भारत घडविताना” या विषयावर लेखक व विचारवंत अच्युत गोडबोले हे व्याख्यान देणार आहेत.सदर व्याख्यान सकाळी ठीक 9 वाजता महाविद्यालयातील नाट्य सभागृहात होणार आहे.तरी सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधी व विचारांच्या मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन रुसा व प्रताप महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
