अमळनेर : “येणारा काळ हा स्पर्धात्मक युगाचा आहे. इथून पुढची सर्व नोकरी भरती ही स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातूनच होणार असल्याने विद्यार्थ्यांनी जगात घडणाऱ्या घडामोडींचे ज्ञान अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. केवळ पैशाच्या जोरावर नोकरी मिळवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची कास धरून आपले जीवन सुखकर करावे,” असे प्रतिपादन नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड यांनी केले.

