अमळनेर : गडखाब शिवारात साडेतीन कोटींचा गांजा पकडणाऱ्या पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या ‘तत्परते’चे सर्वत्र कौतुक होत असतानाच, दुसरीकडे याच गावातील एका जागृत शेतकऱ्याने प्रशासकीय डोळे उघडणारा सवाल केला आहे. “गुन्हा करणाऱ्यावर तत्परतेने कारवाई करणारे अधिकारी, बाजार समितीत दररोज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या लुटीकडे दुर्लक्ष का करतात?” असा खळबळजनक प्रश्न गडखांब येथील शेतकरी रमेश व्यंकट पाटील यांनी उपस्थित केला आहे.

