अमळनेर: तालुक्यातील गडखांब शिवारात अंमली पदार्थांच्या शेतीवर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. शेतातील कापसाच्या आड लपवलेला तब्बल ३ क्विंटल गांजा पोलिसांनी हस्तगत केला असून, बाजारभावाप्रमाणे याची किंमत साडेतीन कोटी रुपयांच्या घरात आहे. याप्रकरणी गट क्र. २३२४ मधील शेतकरी सुरेश पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

