अमळनेरमध्ये अज्ञात व्यक्तीचा अपघाती मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

अमळनेर : शहरातील इदगाह रस्त्यावर मुस्लिम कब्रस्तानजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, वाहनाच्या धडकेने किंवा डोक्यावरून चाक गेल्याने या व्यक्तीचा गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अमळनेर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, दि. २३ जून २०२६ रोजी सकाळी ०८:१८ वाजताच्या सुमारास ईदगाह रस्त्यावरील सार्वजनिक जागेत एक अनोळखी इसम पालथ्या अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय, अमळनेर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

या घटनेची माहिती शेख रियाजोद्दीन रुक्नोद्दीन (वय ४८ वर्ष, रा. दर्गाअली मोहल्ला, गांधीलपुरा, अमळनेर) यांनी पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू नोंद क्र. ६४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह सध्या ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे

मृत अनोळखी इसमाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे:

वय: अंदाजे ६० ते ६५ वर्षे

बांधा: सडपातळ

रंग: काळा

डोक्याचे केस: पांढरे

डोळे: अर्धवट उघडे

उंची: ५ ते ५.५ फूट

नाक: सरळ

दाढी: बारीक पांढरी

पोशाख/नेसणीस: लाल रंगाचा चेक्सचा फुल बाह्यांचा शर्ट (त्यावर काळ्या रंगाचे पट्टे असलेला), गळ्यात बागायतदार पांढरा रुमाल, जिओ कंपनीची तपकिरी रंगाची निकर आणि निळ्या रंगाची फुल नाईट पॅन्ट.

अवाहन:

वर नमूद केलेल्या वर्णनाच्या व्यक्तीला किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणी ओळखत असल्यास त्यांनी तातडीने अमळनेर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अंमलदार पोहेका/१३०३ विनोद लक्ष्मण सोनवणे यांनी केले आहे.

संपर्क क्रमांक:

अमळनेर पोलीस स्टेशन: ०२५८७-२२३३३३

तपास अंमलदार (विनोद सोनवणे): ८८८८८७५३२३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!