अमळनेर : सार्वजनिक ठिकाणी बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या आणि वाहनांना ‘मॉडिफाइड सायलेन्सर’ लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. ही धडक मोहीम शहरातील बस स्थानक आणि मुख्य बाजारपेठ परिसरात राबविण्यात आली.

