अमळनेर, राज्यात विविध ठिकाणी बॅगलिफ्टिंग करणारी तसेच अमळनेर येथून ९ लाख रुपये लांबवणारी आंध्रप्रदेशातील चोरांच्या टोळीच्या अमळनेर पोलिसांना मुसक्या आवळण्यात मिळाले यश.

सविस्तर वृत्त असे की,दि १० फेब्रुवारी रोजी अमळनेर मधील रहिवासी बापू शिंगाणे यांनी प्लॉट घेण्यासाठी आयडीबीआय बँकेतून काढलेल्या ९ लाख रुपये पैशांची पिशवी मोटरसायकलला लावुन आपल्या पत्नीसह घराजवळ पोहचताच अज्ञात दोन मोटरसायकलस्वारांनी पिशवी लांबवली होती.याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असता पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी आपल्या पथकाला तपासणी साठी पाठवले असता आरोपीनी बुलढाणा जिल्ह्यात खामगाव येथे देखील चोरी केल्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ ,हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार ,निलेश मोरे , विनोद संदानशीव ,उज्वल म्हस्के याना आरोपींचा मागोवा घेण्यास सांगितले. आरोपींचे फुटेज पथकाने सर्वत्र पाठवले असता मध्यप्रदेशात कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत यासदृश्य आरोपी ७० हजार चोरी करताना सापडल्याचे समजले. नूतन डीवायएसपी विनायक कोते यांच्या आदेशाने पथक मध्यप्रदेशात रवाना झाले.
मध्यप्रदेशातील हरदा जिल्ह्यातील कारागृहात गोड्डे टू सलमान रामुलू वय ५३ , छल्ला प्रभुदास रमेश वय ३१ रा कप्परल्लथिप्पा ,पेटला शरेसकुमार संपथकुमार वय ३२ ,डी भावेश मोहनधुरू वय २० सर्व रा कपरल्ला ठिप्पा बोगोलू मंडलंम गल्ली मुदुगुनेलोर ,ब्रिन्टगुंठा आंध्रप्रदेश हे आरोपी अटकेत होते. यातील दोघांनी अमळनेर येथे ९ लाखांची चोरी केल्याचे स्पष्ट झाले. अमळनेर पोलिसांनी या चौघांचा ताबा घेतला. त्यांची प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी अमळनेर सह राज्यात इतर ठिकाणी चोऱ्या केल्याचे कबुल केले.
चारही आरोपीना अमळनेर पोलीस स्टेशनला अटक केली असून त्यांच्याकडून अनेक ठिकाणच्या चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सदर चोरांचा छडा लावण्यात पोलिसांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
