श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने लाखो भाविकांनी घेतले दर्शन…

अमळनेर- तालुक्यातील निम येथील श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने खान्देशासह राज्यभरातील भाविकांनी हजेरी लावीत दर्शन घेतले.

दर्शनासाठी भाविकांनी मोठ्याप्रमाणात रांगा लागल्या होत्या. लाखो भाविक श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिरावर दाखल झाले होते.तसेव्ह दर्शनासाठी परप्रांतीय भाविक हे  मुक्कामीच आले असल्याने मंदिराचे ट्रस्टी यांनी सेवा दिली.सकाळी ट्रस्ट तर्फे मगन पाटील यांनी अभिषेक केला.सकाळी ९ वाजता श्री.खंडा महाजन यांनी ध्वज लावला.जळगाव, धुळे, नंदुरबार, गुजरात येथील भाविक आले होते.शिंदखेडा,अमळनेर तालुक्यातील लोक प्रतिनिधी यांनी व लाखो भाविकांनी दर्शन घेतले.

विशेष बाब म्हणजे खासदार स्मिताताई वाघ,माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी यांनीही कपिलेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.

अमळनेर येथून जादा एस टी बस सेवा पूरविण्यात आल्या होत्या.कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक राजेश राठोड, मुनाफ तडवी यांच्यासह स्वकाऊट विद्यार्यांनी सेवा देत परिसर स्वच्छ ठेवला होता. सकाळी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्याने मंदिराच्या एक किलोमीटर अंतरापर्यन्त सर्वत्र गर्दीं दिसत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!