आंतरवासिता उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा जागर; अमळनेरातील दोन शाळांमध्ये वृक्षारोपण….. जय योगेश्वर विद्यालय व जी. एस. हायस्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    अमळनेर  : नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अमळनेर येथील आंतरवासिता उपक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अमळनेर शहरातील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय व जी. एस. हायस्कूल येथे वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती उपक्रम राबविला.

     जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात गटप्रमुख प्रा. डॉ. जितेश चव्हाण व श्रीयुत सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व, वृक्षसंवर्धनाची गरज तसेच पर्यावरण संतुलनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून लावलेल्या रोपांचे संगोपन व नियमित देखभाल करण्याचा संकल्प करण्यात आला.

     या उपक्रमात आंतरवासिता विद्यार्थी चेतन पवार, स्वप्नील पाटील, योगेश पाटील, धनश्री शिंदे, यशोदा शिंदे, मयुरी पवार, हर्षदा पवार, प्रतीभा पवार, लुइजा शेख व हिना शेख यांनी सहभाग घेतला. विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एस. यू. पाटील, एन. के. पाटील, भोई सर, मोरे सर, पाटील सर आदी उपस्थित होते.

    दरम्यान, जी. एस. हायस्कूलमध्ये प्राध्यापक डॉ. सुनंदा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण आणि वाढत्या प्रदूषणाचे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली.

     यानंतर प्रशिक्षणार्थी शिक्षक विद्यार्थी प्रतीक्षा पाटील, निकिता पाटील, रुचिका पाटील, नेहा पाटील, नूतन पाटील, सोनल पाटील व प्रज्ञा पाटील यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

   या प्रसंगी जी. एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद कदम तसेच शिक्षक आर. जे. पाटील उपस्थित होते.

      दोन्ही शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमातून “वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा” हा संदेश देण्यात आला. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवडी सोबतच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले. आंतरवासिता उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!