मंगल’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात

    अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात सोमवारी (दि. २१ सप्टेंबर) श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आयोजित या सोहळ्यासाठी पहाटे ४ वाजता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते पंचामृत अभिषेकाने सुरुवात झाली.

      यानंतर ध्वजपूजन, नवीन ध्वजारोहण, श्री मंगळग्रह देवांचा पाळणा, महाआरती व ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. निर्गुण फूल भांडारचे वाल्मीक पाटील यांनी यंदा देशी-विदेशी ५६ फळांचा विशेष नैवेद्य अर्पण केला. मंदिर परिसरात विविध देशी-विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

     दुपारी श्री महाभोमयाग, सायंकाळी वाद्यवृंदासह श्री मंगळग्रह देवांची पालखी मिरवणूक आणि त्यानंतर महाधुपारतीने सोहळ्याची सांगता झाली. दिवसभर हजारो भाविकांनी दर्शन व पाळणा घेण्याचा लाभ घेतला. जन्मोत्सवातील धार्मिक विधींचे सोशल मीडियावरून जगभरात थेट प्रक्षेपण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!