अमळनेर: “साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पोवाड्यात गिरणी कामगारांचा संघर्ष, लोकनाट्यात राजकीय उपहास, कथांमध्ये जातीय अपमान, तर कादंबऱ्यांमध्ये सामाजिक परिवर्तनाची आकांक्षा दिसते. अण्णाभाऊ केवळ लोककलावंत नव्हते, तर श्रम, जात आणि सांस्कृतिक वर्चस्वाचे चिकित्सक विश्लेषण करणारे विचारवंत होते. म्हणूनच त्यांनी साहित्याला खऱ्या अर्थाने संघर्षाची भाषा दिली,” असे प्रतिपादन विविध वक्त्यांनी केले.

