अमळनेर येथील सांडपाणी नाल्याच्या निकृष्ट बांधकामाची व नियमभंगाची चौकशी करा – रघुनाथ मोरे

अमळनेर : मुंदडा ग्लोबल हायस्कूल समोरील भाग ते ओम हाईट्स (गुलमोहर कॉलनी) च्या मागील बाजूने जाणाऱ्या सांडपाणी नाल्याचे बांधकाम नगरपालिकेकडून सुरू आहे. मात्र, या कामात निविदेतील अटी व नियमांचे उल्लंघन करून नाल्याचा मूळ आकार, रुंदी व प्रवाहात बेकायदेशीर फेरफार केला जात असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य रघुनाथ रामभाऊ मोरे यांनी केला आहे.

​याबाबत त्यांनी अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना तातडीने निवेदन सादर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध आदेशांनुसार नैसर्गिक जलस्रोत व नाल्यांच्या प्रवाहात फेरफार करण्यास बंदी आहे. असे असतानाही संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला आहे. यामुळे पावसाळ्यात परिसरात पाणी साचून जीवित व वित्तहानी होण्याची, तसेच डास व आजारपण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

​प्रमुख मागण्या:

​नाल्याच्या निकृष्ट बांधकामाची निष्पक्ष व तटस्थ चौकशी करण्यात यावी.

​पिंपळे रोड येथील रमाई आंबेडकर नगर व म्हाडा कॉलनीलगतच्या नाल्यावर दलित विकास निधीतून प्रताप व्यायामशाळेपर्यंत संरक्षक भिंत व कठडे उभारावेत.

​पावसाळ्यापूर्वी नाल्याची योग्य प्रकारे सफाई करून दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात.

​या निवेदनाच्या प्रती नगरविकास विभाग मंत्रालय (मुंबई), नाशिक विभागीय आयुक्त आणि जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनाही ईमेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!