‘माझी वसुंधरा’ व ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत अमळनेर नगरपालिकेतर्फे पर्यावरण दिन उत्साहात; १,००० सीडबॉलची निर्मिती व वृक्षारोपण!

अमळनेर: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अमळनेर नगरपरिषद व महिला हाउसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘स्वच्छ भारत अभियान २०२६’ आणि ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ अंतर्गत विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले.

​४ जून रोजी इंदिरा गांधी भवन येथे आयोजित कार्यशाळेत महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल १,००० सीडबॉल (बीजगोळे) तयार केले. तर ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त ओंकार नगर येथे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत अमळनेर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना ‘हरित शपथ’ देण्यात आली.

​घनकचरा नियमावलीबाबत जनजागृती

​कार्यक्रमादरम्यान उपस्थित नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना ‘घनकचरा अधिनियम २०२६’ च्या नवीन नियमांची माहिती देऊन माहितीपुस्तिकांचे वाटप करण्यात आले. तसेच स्वच्छता विभागाच्या कार्यालयात शहरातील १ ते १८ प्रभागांच्या मुकादमांसाठी विशेष कार्यशाळा घेऊन त्यांनाही या नियमावलीबाबत अवगत करण्यात आले व हरित शपथ देण्यात आली.

​”अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवण्यासाठी नागरिकांनी या अभियानात आपले अमूल्य योगदान द्यावे.”

— डॉ. परीक्षित बाविस्कर, नगराध्यक्ष

​या सर्व उपक्रमांना आरोग्य सभापती, नगरसेवक, स्वच्छता निरीक्षक, शहर समन्वयक, महिला हाऊसिंग ट्रस्टच्या पदाधिकारी आणि अमळनेरकर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!