अमळनेर : जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे आणि चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यापक आणि प्रभावी ‘कोबिंग ऑपरेशन’ (Combing Operation) राबवण्यात आले.

या मोठ्या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या मोहिमेत १ उपविभागीय पोलीस अधिकारी, १ पोलीस निरीक्षक, ६ दुय्यम अधिकारी, ६२ अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील १ अधिकारी व १० अंमलदार अशा मोठ्या ताफ्याने भाग घेतला होता.
कारवाईचा सविस्तर तपशील:
१. शस्त्र कायद्यांतर्गत मोठी कारवाई (एकूण जप्त मुद्देमाल: ₹७,३८,०००/-)
पहिली कारवाई:
आरोपी: १) सुरेश उत्तम भलेराव (रा. विठ्ठलवाडी, शिर्डी, जि. अहिल्यानगर), २) संदीप शांताराम गायकवाड (रा. गवडगाव, ता. येवला, जि. नाशिक), ३) अनिल रघुनाथ कचरे (रा. लक्ष्मीवाडी, सावळी विहीर, ता. राहता, जि. अहिल्यानगर), ४) बाबासाहेब नामदेव गायकवाड (रा. पांजरवाडी, ता. येवला, जि. नाशिक).
जप्त मुद्देमाल:
₹३०,०००/- किमतीचे एक सिल्व्हर रंगाची देशी बनावटीची पिस्तूल (काळी व फायबरची मुठ असलेले).
₹६,०००/- किमतीची तीन पिवळ्या धातूचे जिवंत काडतूस.
₹७,०००,०००/- किमतीची मारुती सुझुकी एर्टिगा कार (पांढरा रंग, क्र. MH 17 BY 8894).
एकूण जप्त किंमत: ₹७,३६,०००/-
दुसरी कारवाई:
आरोपी: देवा मनोज पथरोड (रा. भालेराव नगर, अमळनेर).
जप्त मुद्देमाल: ₹२,०००/- किमतीची स्टील मुठीसह ८.५ सेमी लांबीची लोखंडी धारदार तलवार.
२. दारूबंदी कायद्यांतर्गत ९ गुन्हे दाखल (एकूण जप्त मुद्देमाल: ₹१,१५,६४०/-)
अमळनेर शहर व ग्रामीण भागात (मठगव्हाण, नालखेडा, नगाव, पिंपळे, नांदी) हातभट्टी आणि बेकायदेशीर दारूवर छापे टाकून पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला:
गावरान हातभट्टी दारू: २५० लिटर
उकळते रसायन: २५० लिटर
कच्चे रसायन: १४०० लिटर
तयार दारू: १४० लिटर
देशी दारू: ९० एम.एल. च्या ४१ बाटल्या (टँगो पंच)
३. जुगार आणि इतर गुन्हेगारांवर कारवाई
अवैध जुगार कारवाई: अमळनेर शहरातील मच्छि मार्केट, दगडी दरवाजा आणि बाजारपेठ भागात जुगारावर कारवाई करून ₹२,८९०/- रोकड व जुगाराचे साहित्य जप्त.
रेकॉर्डवरील गुन्हेगार व तडीपार/हिस्ट्रीशीटर तपासणी:
दोन किंवा अधिक गुन्हे दाखल असलेले ११३ इसम पोलीस ठाण्यात आणून तपासण्यात आले.
२५ हिस्ट्रीशीटर (Record Criminals) ची तपासणी करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान: सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या ३२ जणांवर महा.पो.का. कलम ११२/११७ प्रमाणे दंडात्मक कारवाई.
कोटपा (COTPA) कारवाई: राणी लक्ष्मीबाई चौक परिसरात उघड्यावर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीप्रकरणी कारवाई करून ₹६००/- चा माल जप्त.
४. वाहतूक नियम आणि इतर कारवाई
वाहतूक अडथळा: वि.एन.एस. कलम २८५ प्रमाणे रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर ०७ केसेस.
मोटार वाहन कायदा (M.V. Act):
एकंदरीत ३६ केसेस, ड्रंक अँड ड्राईव्हच्या ३ केसेस, सायलन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्या २ केसेस मिळून एकूण ₹५१,२००/- दंड वसूल करण्यात आला.
गहाळ/मिसिंग व्यक्तींचा शोध: बेपत्ता असलेल्या ३९ व्यक्तींपैकी ०६ जणांचा शोध लावून त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
वॉरंट बजावणी: १५ पकड वॉरंट, ०६ जामीनकी वॉरंट आणि २१ समन्स असे एकूण ४२ वॉरंट बजवण्यात आले.
हॉटेल व लॉजेस तपासणी: परिसरातील ११ हॉटेल/लॉजेस ची अचानक तपासणी करण्यात आली.
प्रतिबंधक कारवाई: २१ संशयित इसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
पोलीस प्रशासनाचा इशारा:

