अमळनेर : स्थानिक B. BOYS बॉक्सिंग अकॅडमी, अमळनेर येथे दि. २८ जुलै रोजी एक विशेष मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष सुरक्षा दलात (SPG) सेवा बजावलेले माजी SPG कमांडो अरविंद बैसाणे यांनी अकॅडमीला सदिच्छा भेट देऊन खेळाडूंशी संवाद साधला.

