अमळनेर, प्रतिनिधी, तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्ष व १७ वर्ष वयोगटातील दोघीही संघ विजयी झाले असून त्यांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे.
त्याप्रसंगी त्यांना संस्थेचे अध्यक्ष नानासो.डी.डी.पाटील,उपाध्यक्ष प्राचार्य.रावसाहेब.के.डी. पाटील,संचालक बापूसो.नंदकुमार पाटील,संचालक दादासो.शैलेंद्र पाटील,सचिव.राधेश्याम पाटील,सुनील जाधव सर,प्रा.अनिल पाटील सर,संजय सोनवणे सर,एस.व्ही.पाटील सर,एन.के.पाटील सर यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
त्यांना मार्गदर्शक म्हणून सुनील जाधव सर,के.बी.पाटील सर,प्रा.प्रितेश तुरंकर सर,प्रा.डॉ.शैलेश पाटील,स्वप्नील पाटील सर हे लाभले.त्यांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
