अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे. तसेच शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


. मूळ