अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील सिंधी कॉलनी मधील गट नम्बर ४०० मधील रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकारीकडे केली आहे.

सविस्तर वृत्त असे की,सिंधी कॉलनीतील गट नम्बर ४०० मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भुयारी गटारीचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथील रस्ता खोदला गेला आहे. मात्र त्यामुळे स्थानिक नागरिकांना पायी चालणेही मुश्किल झाले आहे.
सदरचा रस्ता त्वरित काँक्रीटीकरण करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकासह रविकुमार अंदानी,राम मलकानी ,श्याम मलकानी,श्याम वासवाणी , भारत सासनाणी,मनोज धर्माणी,संजय मलकानी, संजय हिंदूजा ,राजू मलकानी , लक्ष्मण बजाज आदीनी निवेदन देऊन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याकडे केली आहे.
