अमळनेर येथील नगरपालिका अग्निशमन दलास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागा कडून मिळाली मिनी फायर अँड रेस्क्यू व्हेईकल एमएफआरव्ही.

सविस्तर वृत्त असे की, जिल्हाधिकारी कार्यालय मधील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी दरम्यान एकूण सहा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना मिनी फायर अँड रेस्क्यू व्हेईकल एमएफआरव्ही च्या गाडीची प्रतिकात्मक चावी देत लोकार्पण सोहळा पार पडला.
या वेळी अमळनेर नपाने मुख्याधिकारी तुषार नेरकर सह अग्निशमन दलातील गणेश गोसावी, (फायर अधिकारी) जाफर पठाण, दिनेश बिऱ्हाडे, फायरमन आदींना सदर वाहनाची प्रतिकात्मक चावी देण्यात आली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेही,मुख्या कार्यकारी अधिकारी अंकित,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरबीर राबळ उपस्थित होते.
मिनी फायर अँड रेस्क्यू व्हेईकल एमएफआरव्ही ची वैशिष्टये पुढील प्रमाणे आहेत….
यात प्रगत आपत्कालीन प्रतिसाद युनिटचे वाहन हाय प्रेशर वॉटर मीटर सिस्टीम,हाय प्रेशर वॉटर मिटर सिस्टीम,फोम प्रेशर सिस्टीम आपत्कालीन रेस्क्यू टूल्स (बचाब कार्य साहीत्य),आग, भूस्खलन, पूर,रेल्वे अपघात यासह विविध आपत्ती दरम्यान तात्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणायातआहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातीलआपत्ती झोन पर्यत पोहोचण्याची क्षमता.
जिल्ह्यातील जीवित व वित्तहानीशी सक्षमपणे सामना करण्यासाठी शहरासह तालुक्यात अग्निशमन
यंत्रणा अद्यावत असणे आवश्यक होती, त्याची पूर्तता झाली आहे.
