अमळनेर येथील उपविभागीय पोलीस कार्यालयाला अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या डीवायएसपी पदी नागपूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक बाजीराव कोते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पद रिक्त होते.कोण अधिकारी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.कारण शहरात वाढत असलेली गुन्हेगारी, जातीय दंगलीचे वातावरण या पार्श्वभूमीवर एक सक्षम पोलीस अधिकारी असणे गरजेचे होते. असे असूनही चोपड्याचे डीवायएसपी आबासाहेब घोलप याना पदभार देण्यात आला होता. दोन विभागाचा पदभार सांभाळताना त्यांच्यावर ताण पडत होता.अमळनेर पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी आपले पूर्ण कसब पणाला लावून शहरात शांतता राखण्याचा कसोशीने प्रयत्न केले आहे. आता नवीन डीवायएसपी मिळाल्या मुळे कारभार सुरळीत होणार आहे.
नव्याने नियुक्त झालेल्या डीवायएसपी विनायक कोते यांच्या समोर शहरातील वाढते अवैध धंदे,वाढती गुंडगिरी व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन आहे. त्यांनी या संताच्या भूमीला लागलेला गुंडगिरी व धार्मिक तेढ चा कलंक पुरता पुसून काढण्याची अपेक्षा सुज्ञ नागरिक करीत आहे.
