अमळनेर : अमळनेर नगर परिषद हद्दीत रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्या जनावरांच्या मालकांविरुद्ध आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यांवर गाय, बैल तसेच इतर मोकाट जनावरे फिरत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

