अमळनेर: ‘डिजिटल जनगणने’चा श्रीगणेशा; १ मे पासून घराची माहिती आता घरबसल्या नोंदवता येणार……. अमळनेर नगरपरिषदेचे नागरिकांना ‘स्व-गणना’ सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन
अमळनेर : भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत आयोजित ‘जनगणना २०२७’ च्या पहिल्या टप्प्याला लवकरच सुरुवात होत आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा प्रथमच नागरिकांना आपली माहिती स्वतः नोंदवण्यासाठी डिजिटल ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत ही सुविधा खुली राहणार असून, अमळनेर शहरातील नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अमळनेर नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
’आमची जनगणना, आमचा विकास’
’आमची जनगणना, आमचा विकास’ या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात घरसूची आणि गृहगणनेचे काम केले जाणार आहे. नागरिकांचा वेळ वाचावा आणि माहिती अचूक संकलित व्हावी, या हेतूने केंद्र सरकारने हे डिजिटल पाऊल उचलले आहे.
अशी असेल ‘स्व-गणना’ प्रक्रिया:
१ मे पासून सुरू होणाऱ्या या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी खालील टप्प्यांचा अवलंब करावा:
लॉग-इन: अधिकृत पोर्टल se.census.gov.in वर जाऊन स्वतःच्या मोबाईल क्रमांकाद्वारे (OTP द्वारे) लॉग-इन करावे.
तपशील निवडा: पोर्टलवर राज्य, जिल्हा आणि अमळनेर शहराचा तपशील निवडावा.
लोकेशन: डिजिटल नकाशावर आपल्या घराचे अचूक लोकेशन निश्चित करावे.
नोंदणी: कुटुंबाची आवश्यक माहिती भरल्यानंतर प्रणालीद्वारे एक ‘SE ID’ जनरेट होईल.
SE ID जपून ठेवा: हा आयडी अत्यंत महत्त्वाचा असून तो नागरिकांनी स्वतःकडे लिहून किंवा सेव्ह करून ठेवावा.
प्रगणकांना फक्त SE ID द्यावा लागणार
जे नागरिक १५ मे पर्यंत ‘स्व-गणना’ पूर्ण करतील, त्यांच्या घरी १६ मे ते १४ जून या कालावधीत जेव्हा नगरपरिषदेचे अधिकृत प्रगणक (Enumerators) येतील, तेव्हा त्यांना केवळ हा ‘SE ID’ दाखवणे पुरेसे ठरेल. यामुळे प्रत्यक्ष सर्वेक्षणात खर्च होणारा वेळ वाचणार आहे. जे नागरिक ऑनलाइन नोंदणी करू शकणार नाहीत, त्यांची माहिती नेहमीप्रमाणे प्रगणक प्रत्यक्ष घरी येऊन नोंदवून घेतील.
नगरपरिषदेचा संदेश:
“नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय आणि कायद्याने सुरक्षित असणार आहे. शहराचे पुढील दशकाचे नियोजन, शासकीय योजनांचा लाभ आणि निधीचे वाटप हे जनगणनेच्या आकडेवारीवरच अवलंबून असते. त्यामुळे अमळनेरच्या सुजाण नागरिकांनी ‘मी प्रगती आहे, मी विकास आहे’ या संदेशाला प्रतिसाद देऊन या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे.”
मुंबई प्रतिनिधी, अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतील सूचनांनुसार शाकाहारी व मांसाहारी पदार्थाची तयारी, प्रक्रिया, शिजवणे वेगळी असावी. शाकाहारी अन्नपदार्थाची…