अमळनेर न पा च्या अतिक्रमण विभागाने शहरातील 26 अतिक्रमण काढले……मुख्याधिकारी नेरकरांच्या धाडसाचे सुज्ञ नागरिकां कडून कौतुक

अमळनेर येथील झामी चौकातील रस्त्याला अडथळा ठरणारी २६ अतिक्रमणे पालिकेने हटवली. 

सविस्तर वृत्त असे की,मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण होत होता. रस्त्यांची कामे करताना देखील अडचणी येत असल्याने अतिक्रमण बाबत कठोर भूमिका घेत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी बांधकाम विभाग अभियंता डिगंबर वाघ ,अभियंता सुनील पाटील, शिमाली आंबोरे , अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल व त्यांच्या पथकाच्या मदतीने दोन जेसीबी मशीन लावून तब्बल २६ अतिक्रमणे अमळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे व पोलिसांच्या चोख बंदोबस्तात उध्वस्त केली. त्यांच्या या धाडसी निर्णयाचा सुज्ञ नागरिक कौतुक करत आहे..

मुख्याधिकारी नेरकर याकडे ही दृष्टी वळवावी….

 अमळनेर शहरात ठीक ठिकाणी राजकीय वरद हस्त घेऊन अनेकांनी मनमानी पद्धतीने अतिक्रमण केलेले दिसून येत आहे.कॉलनी परिसरात देखील अतिक्रमण झाल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पावसाचे पाणी निचरा होत नसल्याने कॉलनी परिसरात पाणी साचते. तर शहरातील बाजार पेठेत सुद्धा अनेक व्यापाऱ्यांनी दुकानासमोर अतिक्रमण केलेले असल्याने नागरिकांना रस्त्याने चालताना अडथळा निर्माण होत आहे. 

      विशेष बाब म्हणजे शहरातील दगडी दरवाजा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने माजी आमदार साहेबराव पाटील यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन सदरचा दगडी दरवाजाचा आकार कमी करण्याचा धाडसी निर्णय घेऊन महामार्ग मोकळा केला. मात्र दगडी दरवाजा लगत असलेल्या दुकानदारांनी पादचारी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने पुन्हा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने सदरचे अतिक्रमण मुख्याधिकारी केव्हा काढतील, असा सवाल नागरिक करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!