अमळनेर येथे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मराठा जोडो अभियान अंतर्गत माँ जिजाऊ रथ यात्राचे अंमळनेर शहरात बहुजन समाजाच्या वतीने मोठ्या उत्साह स्वागत करण्यात आले.
माँ जिजाऊ रथ यात्राचे मुख्य संयोजक सौरभ खेडकर यांनी शहरातील मराठा समाज मंगल कार्यालयात उपस्थित बहुजन समाजाला संबोधित करतांना सांगितले की,फुले ,शाहू , आंबेडकरांचा पुन्हा जागर करून महाराष्ट्राची विस्कटलेली घडी सुरळीत कराण्यासाठी जिजाऊ रथयात्रा काढण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाला शांतता आणि समन्वयाचे जीवन जगणे आवडते म्हणून सामाजिक शांतता निर्माण होण्यासाठी राज्यभर जाणार असल्याचे सांगितले.
पदयात्रेचे अमळनेरात अगमन झाल्यानंतर धनगर समाजाचे अध्यक्ष मच्छीन्द्र लांडगे, मुस्लिम समाजाचे रियाज मौलाना, खाटीक समाजाचे हमीद गुरुजी, मराठा समाजअध्यक्ष जयवंतराव पाटील , मराठा सेवा संघातर्फे अशोक पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा वैशाली शेवाळे, मराठा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा शीला पाटील, आदिवासी ठाकूर समाजातर्फे दिलीप ठाकूर, खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक , अर्बन बँकेचे संचालक प्रदीप अग्रवाल, माळी समाजातर्फे लक्ष्मण महाजन , बौद्ध धम्मीय उपासक योगराज संदानशीव, पारधी समाज अध्यक्ष संजू पवार, जैन समाजातर्फ घेवरचंद कोठारी,नाभिक समाजातर्फे कैलास सैदाने, दीपक खोंडे, भोई समाजा तर्फे संजय भोई, कुणबी समाज अध्यक्ष शेखवर पाटील या विविध समाजातर्फ स्वागत करण्यात आले.
पैलाड येथून जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांच्या मोटरसायकल रेली ने रथ यात्रा सन्मानाने शहरात आणण्यात आली. सदर यात्रा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,सुभाषचंद्र बोस ,सानेगुरुजी , छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप ,बळीराजा यांच्या पुतळ्यांची पूजा करून अभिवादन करण्यात आले. त्यांनतर धुळे रोडवरील प्रवेशद्वारा जवळ रथ यात्रेचा समारोप झाला. तेथून रथ यात्रा मराठा समाज मंगल कार्यालयात आल्या नन्तर सभेत रूपांतर झाले.
यावेळी प्रा अर्जुन तनपुरे म्हणाले की महाराष्ट्रातील १८ पगड जातीना एकत्र करून महापुरुषाच्या विचारांचा प्रचारप्रसार करण्यासाठी ही जातीविरहित रथयात्रा आहे. राज्यात अस्थिरता आली आहे, जातिजातीत भेद केले जात आहेत हे डाव उधळून लावण्यासाठी सर्व समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी ही रथयात्रा आहे.
व्यासपीठावर मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष जयवंतराव पाटील, चाळीसगावचे सुधीर पाटील , सुरेश पाटील , डॉ गजानन पारधी हजर होते.सुरुवातीला वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना म्हटली.सूत्रसंचालन प्रा डॉ लीलाधर पाटील यांनी तर आभार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी मानले.
यांनी केले यशस्वीतेसाठी अथक परिश्रम :-
सौ तिलोत्तमा पाटील ,सीमा पाटील ,स्वप्ना पाटील ,शीतल सावंत ,पद्मजा पाटील आरती पाटील , अनिता संदानशिव , नूतन पाटील,पूनम ठाकरे ,सुरेखा खैरनार , विक्रांत पाटील , श्याम पाटील प्रा अशोक पवार, रामेश्वर भदाणे , मनोहर निकम ,वाल्मिक मराठे दीपक पाटील , प्रा डॉ विलास पाटील,कैलास पाटील, एस एम पाटील , निंबाजी पाटील, प्रेमराज पवार,चंद्रकांत देसले यांचे सहकार्य लाभले.
