अमळनेर येथील सि.स.नं.३२२३ ब १ मधील प्लॉट क्र. १९ व २० मध्ये मोहन सातप्ते व उर्मिला वर्मा यानी केलेले अतिक्रमण व स्वतः अमळनेर नगरपरिषद ने केलेले बेकायदा बांधकाम तोडावे म्हणून दिपक कंखरे व स्थानिक नागरिकांनी न पा कार्यालयात झोपेचे सोंग घेतलेल्या नपा प्रशासनाला ढोल वाजवून जागं करण्यासाठी आंदोलन केले.

आंदोलन करणारे दिपक कंखरे यांनी सदर बेकायदेशीर बांधकाम तोडेण्याची वेळोवेळी तक्रार देऊन सुध्दा दखल नघेता न पा प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत आहे. हे मुख्याधिकारी नेरकर यांच्या पदाला शोभणारे नाही. ही बाब शासकीय वर्तणूक नियमाच्या ध्येय धोरणा विरूद्ध दाद मागण्यासाठी दि.२३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मुख्याधिकारी दालनात ठिय्या आंदोलन व घंटानाद केल्याची भावना आंदोलकांनी देशोन्नती कडे व्यक्त केली . तसेच सदर बेकायदेशीर बांधकाम व रस्ता तोडावा अन्यथा सर्व स्थानिक नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला आहे.
यांबाबत न पा मुख्याधिकारी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले असता ते जळगावं येथे मीटिंगला गेले असल्याचे उप मुख्याधिकारी चव्हाण यांनी सांगितल्या नंतर यांच्याशी भ्रमनध्वनी द्वारे देशोन्नती प्रतिनिधिनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
विशेष बाब मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी आंदोलकाना आज दि 24 रोजी आपल्या दालनात चर्चेसाठी बोलावले होते. त्यावेळी सदर बाबीची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करणार असल्याचे सांगितले.
