अमळनेरात धनगर समाजाचा एस टी संवर्गात समाविष्ट साठी येल्लगार…..केला चक्का जाम.

अमळनेर प्रतिनिधी येथील,धनगर समाजाच्या वतीने शहरातील पैलाड भागातील चोपडा नाका येथे एस टी संवर्गात समाविष्ट करण्यात यावा म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

धनगर जमातीला एसटी आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील पंढरपूर, लातूर,नेवासा फाटा व पुणे येथे धनगर बांधव उपोषणाला बसले आहेत.त्यांना पाठिंबा म्हणून अमळनेर तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने आपल्या सोबत शेळ्या – मेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरले व शहरातील चोपडा नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनात धनगर बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्यामुळे रस्ता व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

दरम्यान अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे साहेब यांनी आंदोलकांची संवाद साधत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करीत  मागण्या प्रशासनाकड़े त्वरित पाठवतो असे आश्वासन दिले.यावेळी बहुसंख्येने उपस्थित असलेल्या धनगर बांधवांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

याप्रसंगी वसुंधरा लांडगे, डी ए धनगर प्रा. लक्ष्मण निळे,सेवानिवृत्त पीआय हिरामण कंखरे,चेतन देवरे यांनी आंदोलनाची भूमिका मांडून उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केले.

आंदोलनात मच्छिंद्र लांडगे नितीन निळे , समाधान धनगर, जिभाऊ कंखरे, गोविंदा कंखरे, सुधाकर पवार, विलास लॉंडगे, शिरसाठ, धनराज कंखरे,दिलीप शिरसाट, संजय शिरसाट, पंडित लांडगे,राजू मोरे, दीपक लांडगे, पिंटू लांडगे, प्रताप कंखरे,बापू मिस्तरी, संतोष लांडगे, तुषार इथे, शशिकांत लांडगे, रमेश बिहडि, वसंत बित्हाडे, नाना शिरसाट,समाधान लांडगे, सतीश धोडू, भिका लांडगे,मुरलीधर मोरे, शशिकांत आढावे, प्रीतम रत्नपारखी, उमेश मनोरे यांसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!