अमळनेर : तालुक्यातील मेहेरगाव येथे एक अत्यंत संतापजनक आणि किळसवाणी घटना समोर आली आहे. घराच्या अंगणात खेळणाऱ्या १० वर्षांच्या चिमुकलीसह इतर बालिकांसमोर अश्लील चाळे करणाऱ्या गावातीलच ७७ वर्षीय वृद्धाविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २० जुलै २०२६) सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास मौजे मेहेरगाव (ता. अमळनेर) येथील रहिवासी फिर्यादी शिवाजी नामदेव भिल (वय ३२, धंदा मजुरी) यांच्या अंगणात त्यांची १० वर्षांची मुलगी, चुलत पुतणी आणि मामाची मुलगी अशा तीन लहान मुली खेळत होत्या.त्याच वेळी गावातीलच रहिवासी असलेला आरोपी काशिनाथ आनंदा कोळी (वय ७७ वर्षे, रा. मेहेरगाव) याने तेथे येऊन आपल्या पॅन्टची चैन उघडून मुलींसमोर अश्लील चाळे केले व अश्लील इशारे केले. घाबरलेल्या मुलींनी तात्काळ घरात पळून जाऊन घडलेला प्रकार पालकांना सांगितला.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी मुलींच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात आरोपी काशिनाथ कोळी याच्याविरुद्ध: भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ७५(३), ७९ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO): कलम १२ अन्वये गुन्हा रजि. नं. १४०/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची गंभीर दखल घेत मारवड पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) श्री. साजिद मजीद मंसुरी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि साजिद मंसुरी करत असून, परिसरात सध्या शांतता आहे.
अमळनेर येथील पोलीस स्टेशन परिसरात चोरी प्रकरणातील बेवारस स्थितीत १५ दुचाकी वाहने आहेत.पोलिसांनी आजपावेतो सर्वतोपरी प्रयत्न करुन बेवारस वाहनाच्या मालकांचा…