अमळनेर येथील अवैध वाळू चोरीला आळा बसावा म्हणून महसूल विभागाच्या वतीने कारवाई होत नसल्याने परिक्षाविधींन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री केदार बारबोले यांनी सापळा रचून वाळू तस्करी करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या.

सविस्तर वृत्त की अमळनेर शहरासह तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीचे प्रमाण वाढलेले असताना त्यावर कारवाई होत नसल्याची तक्रार माननीय परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री केदार बारबोले साहेब अमळनेर पोलीस स्टेशन यांना प्राप्त झाल्याने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता जी नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनायक कोते साहेब यांचा मार्गदर्शनाने परीवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री केदार बारबोले साहेब अमळनेर पोलीस स्टेशन यांच्या आदेशान्वये दिनांक 3/2/2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक श्री नामदेव बोरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदानशिव, उज्वल मस्के, निलेश मोरे, प्रशांत पाटील अशांचे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करणे कामी पथक तयार करण्यात आले. त्यानंतर बारबोले साहेब यांना गोपनीय माहिती मिळाली की, बोरी नदीच्या पात्रातून अवैधपणे वाळूचे उत्खनन होत असून त्यात ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची चोरटी वाहतूक करण्यात येत आहे. त्यानंतर वरील पथकाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बहादरवाडी फाट्याजवळ सापळा रचून रात्री 11.00 वाजेच्या सुमारास तीन ट्रॅक्टर पकडले.
1)स्वराज 744FE कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक MH 19 AN 4460 वरील चालक रवींद्र बुवाजी दिल वय 30 वर्ष राहणार रुपजी नगर अमळनेर.
2)स्वराज 744FE कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक MH 19 BG 7029 वरील चालक अर्जुन शिवा पवार वय 26 वर्ष राहणार हिंगोना तालुका अमळनेर
3) स्वराज 744FE कंपनीचे विना नंबर प्लेट चे लाल रंगाचे ट्रॅक्टर निळ्या रंगाची ट्रॉली असलेले त्यावरील चालक किशोर शांताराम पाटील वय 26 वर्ष राहणार हिंगोना तालुका अमळनेर यांना ट्रॅक्टर वाढवणे भरलेल्या ट्रॉली सह पोलिसांनी ताब्यात घेऊन अंमळनेर पोलीस स्टेशनला आणून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला आहे. वरील आरोपी यांचे विरुद्ध भारतीय न्याय संहीता कलम 303(2) सह जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7)48(8) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वरील आरोपी यांना अटक करून आज रोजी माननीय न्यायालयाकडून त्यांची एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. आरोपी त्यांना विचारपूस करून सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर साहेब करीत आहेत.
अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध वाळू वाहतुकीसह इतर अवैध धंदे करणारे व करण्यास भाग पाडणारे मूळ मालकांच्या शोध घेऊन कठोर कारवाई केली जाईल असे यावेळी अमळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री बारबोले साहेब यांनी सांगितले आहे.
