कठोर कलमांऐवजी ‘तथूर-मातूर’ कलमे लावल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अमळनेर येथे नुकत्याच उघडकीस आलेल्या बनावट दारू कारखान्याच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केली असली, तरी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या ‘सौम्य’ कलमांमुळे सर्वसामान्य जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. मानवी जीवाशी खेळणाऱ्या या गुन्हेगारांवर भारतीय दंड संहितेचे (IPC) कलम ३२८ किंवा नवीन भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम १२३ लावणे अपेक्षित असताना, विभागाने केवळ उत्पादन शुल्क नियमावलीनुसार जुजबी कारवाई केल्याने संशयाचे धुके गडद झाले आहे.

