रस्त्यात बेशिस्त वाहन लावणाऱ्यावर पोलिसांची दंडात्मक कारवाई…..तब्बल १२ हजार १०० रुपये दंड केला वसूल 

अमळनेर येथील रस्त्यात बेशिस्त वाहन लावून अडथळे निर्माण करणाऱ्या वर पोलिसांनी कारवाई करून ठोठावला दंड.

सविस्तर वृत्त की, अमळनेर शहर हे व्यापारी पेठ म्हणून इतिहासात नोंद आहे. तसेच या तालुक्यात अनेक धार्मिक स्थळे असल्याने भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. असे असून ही न पा प्रशासनाची शहरात वाहनतळ उभारण्यात बोंबाबोंब आहे. शहरात वाहनतळ उभारावे म्हणून नागरिक मागणी करीत आहे.तालुक्यात येणारे वाहन धारक हे शहराच्या हम रस्त्यात वाहन बेशिस्तपणे लावत असल्याने वाहतुकीला मोठ्याप्रमाणात अडथळे निर्माण होत आहे.यामुळे अनेक अपघात होऊन प्रसंगी दोन वाहन चालक यांच्यात विकोपाचे भांडण झाले आहे.त्यातच शहरात मोकाट फिरणारे गुरे ढोरे ही वाहतुकीस अडथळे ठरत आहे. या सर्वा गोष्टीचा बंदोबस्त करावा म्हणून नागरिक मागणी करत आहे.

      शहरातील बेशिस्त वाहन चालकांना चाप बसावा म्हणून अमळनेर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी याबाबत गंभीर दखल घेत वाहतूक नियंत्रक कक्षातील आपले सहकारी पोलीस बागुल,संजय बोरसे, विनय पाटील, रवींद्र बोरसे यांना योग्यती सूचना करीत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेशिस्त वाहन धारका विरोधात कायदेशीर कारवाचे आदेश दिले.

वाहतूक नियंत्रक पोलीस विलास बागुल,संजय बोरसे, विनय पाटील, रवींद्र बोरसे यांनी शहरातील चोपडा धुळे रस्ता,महाराणा प्रताप चौक ते दगडी दरवाजा आदी ठिकाणी अडथळे निर्माण करणारे वाहने, प्रवासी वाहने, किरकोळ विक्रेते, हातगाड्या आणि थांबलेल्या वाहनांमुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाल्याने सामान्य नागरिकांना खूप त्रास होत असल्यामुळे भारतीय न्यायसंहिता कलम 285 प्रमाणे तब्ब्ल 13 जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्या. डी.टी. वसावे यांनी प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 102,117 प्रमाणे सहा हातगाड्यांवर कारवाई केली.त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी 500 रुपये दंड ठोठावला तसेच जादा प्रवासी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कलम 66, 192 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता दोन हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला.

      सदर कारवाई मुळे नागरिक तूर्त समाधान व्यक्त करीत आहेत मात्र ही कारवाई निव्वळ फार्स ठरू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच न पा प्रशासनाने त्वरित वाहनतळ उभारून ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!