अमळनेर येथील महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेनी आपल्या विविध मागण्याकरिता आपली डिजिटल स्वाक्षरी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे देऊन काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सविस्तर वृत्त की, गेल्या अनेक दिवसांपासून महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी कामकाज सुरळीत व वेळेत व्हावे म्हणून शासनाने लॅपटॉप आणि कॉम्प्युटर दिले होते मात्र ते कालबाहा झाले आहेत.त्यांची मुदत पाच वर्ष असताना अनेक वर्षे झालीत, दरम्यान संगणकाचे वर्जन बदलले त्यामुळं स्पीड मिळत नाही आदी अनेक अडचणी आहेत. या कारणास्तव शासनांकडे लॅपटॉप आणि प्रिंटर ची मागणी केलेली होती. मात्र या मागण्या कडे शासन दुर्लक्ष करीत आहे.

