अमळनेर येथील मांडळ ते अमळनेर रस्ता दुरुस्तीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमरण उपोषण करण्यात आले.

सविस्तर वृत्त की,तालुक्यातील मांडळ ते अमळनेर हा रस्ता गेल्या अनेक दिवसापासुन अपघाताचे ठिकाण झाले आहे. अनेक वाहन चालकांना वाहतुकीला मोठी कसरती कराव्या लागत आहे. मात्र बांधकाम विभाग या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ईश्वर उखा पाटील यांनी केला आहे. सदरचा रस्ता हा त्वरित नव्याने सुरु करावा आणि झालेल्या कामाचे चौकशी करावी व कामास विलंब लावणाऱ्या ठेकेदारसह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून ईश्वर पाटील यांनी आमरण उपोषण काल सकाळी दहा वाजता आपल्या सहकार्यासह सुरु केले.दरम्यान कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री पी.ई .पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन गावकऱ्यांसमोर आश्वासन देण्यात आले की आम्ही रस्त्याचे काम सुरू केले असून आठ दिवसात इतर काम लवकर करण्यात येईल. यामुळे सदर उपोषणाची सांगता रावसाहेब कोळी जिल्हाध्यक्ष आदिवासी कोळी समाज यांच्या हस्ते पाणी पाजून संपन्न झाले .

