न पा निवडणुकीत महायुती सह आघाडी अनेक ठिकाणी एकमेकां विरुद्ध त्यामुळे निकालाबाबत कमालीची उत्सुकता …….

     अमळनेर : राज्यातील २८८ नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी म्हणजेच रविवारी होत आहे.यामध्ये २८८ अध्यक्षपदांच्या आणि ६ हजार ४२ सदस्य पदांच्या भवितव्य ठरणार आहे.

   दरम्यान,शनिवारी मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २३ नगरपरिषदांचे अध्यक्ष आणि सदस्य तसे विविध नगरपरिषदा व नगर पंचायतीं मधील १४३ सदस्य निवडण्यासाठीचे मतदान शनिवारी पार पडले.पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहेत.

सत्ताधारी महायुती व विरोधकांची महाआघाडीने विजयाचे दावे केले असले तरी, आज रविवारी वस्तुस्थिती समोर येईल.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ नगरपरिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम ४ नोव्हेंबरला जाहीर केला होता. त्यानुसार २ डिसेंबरला २६३ नगरपरिषदा व नगरपंचायतीं साठी मतदान झाले.उर्वरित ठिकाणी शनिवारी मतदान पार पडले.

राज्यभरातील नगरपरिषद,नगरपंचायतीं साठीची मतमोजणी २१ डिसेंबरला संबंधित ठिकाणी सकाळी १० वाजता सुरू होईल.सायंकाळ पर्यंत सर्व निकाल हाती येतील अशी शक्यता आहे.

महायुतीतील भाजप,शिंदेसेना आणि अजित पवार गट अनेक ठिकाणी एकमेकां विरुद्ध लढले.

महापालिकांसाठी आयोगाचे निर्देश महापालिका निवडणूक सुरळीत पार पाडण्या साठी आणि आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शुक्रवारी एका बैठकीत दिले. वाघमारे यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली.आयोगाचे सचिव सुरेश काकाणी आदी उपस्थित होते. काकाणी यांनी बैठकीत सादरीकरण केले.महानगरपालिके संदर्भातील अधिनियम व राज्य निवडणूक आयोगाचे विविध आदेश यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.महापालिकांची रंगीत तालीम विरोधी महाविकास आघाडीतील पक्षही अनेक ठिकाणी एकमेकां विरुद्ध रिंगणात होते. त्यामुळे निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!