“येऊन येऊन येणार कोण… प्रशांत निकम शिवाय आहे कोण ” च्या गजरात फोडला प्रचाराचा नारळ…

 

अमळनेर येथील नगरसेवक पदासाठी प्रभाग क्र १५ अ मधून प्रशांत निकम यांचा प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समर्थक आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशांत निकम यांनी आपल्या भावना करडी नजर न्यूज सोबत सांगितले की, त्यांचा मुख्य उद्देश शहराचा विकास करणे आणि नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे आहे. त्यांनी मतदारांना समर्थन देण्याचे आवाहन केले.

नगरसेवक पदासाठी प्रशांत निकम यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या प्रचाराला जोर चढला असून, त्यांना मोठ्या संख्येने मतदारांचा समर्थन मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!