अमळनेर : अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे, त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे स्टार प्रचारकांच्या सभा त्यात रंग भरू लागल्या आहेत. शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परिक्षीत बाविस्कर व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या जाहीर सभेचे उद्या दि.२६ नोव्हें वार बुधवार दुपारी ०२:०० वाजता म्हसकर प्लॉट, स्वामी नारायण मंदिर, स्टेशन रोड, अमळनेर येथे आयोजन केले आहे. असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.वासुदेव पाटील यांनी सांगितले.

