प्रभाग क्रमांक 13 ब मधील चूरशीच्या लढतीत हाजी सलीम शेख फत्तू यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन…

       अमळनेर :- अमळनेर नगरपरिषद निवडणूक चांगलीच रंगात आलेली आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्यां जोमात आहे. तर उमेदवार गल्लो गल्ली पायपीट करतानां दिसत आहेत. त्यातच शहरातील प्रभाग क्रमांक 13 ब मध्ये दि 23 रोजी रविवारी दुपारी 2 वाजता अपक्ष उमेदवार हाजी सलीम शेख फत्तू (शेखा मिस्त्री ) यांनी प्रचार रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला.

       या रॅलीत खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या, ज्यामुळे शेखा हाजी यांच्या नेतृत्वाखालील जनसमर्थनाची ताकद दिसून आली. प्रचारादरम्यान, शेखा हाजी यांनी प्रभागातील पाण्याच्या समस्या, रस्त्यांची दुरवस्था आणि स्वच्छता यांसारख्या स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. मतदारांशी थेट संवाद साधून त्यांनी ‘विकास’ हा आपला मुख्य अजेंडा असल्याचे स्पष्ट केले.

       रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी शेखा हाजी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. या शक्तिप्रदर्शनामुळे प्रभाग 13 ब मधील निवडणूक दोन प्रमुख गटांमध्ये विभागली गेली असून, येथील लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शेखा हाजी यांच्या अपक्ष उमेदवारीने येथील राजकीय समीकरणे बदलली असून, सर्वच उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

      प्रभाग 13 ब मध्ये शेखा हाजी यांचे हे शक्तिप्रदर्शन प्रतिस्पर्धी उमेदवारांना नक्कीच विचार करायला लावणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!