आमचा वचननामा हा पूर्ती साठी आहे” – मा. आमदार शिरीष चौधरी…..नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट)चा वचननामा जाहीर

आमचा वचननामा हा पूर्ती साठी आहे” – मा. आमदार शिरीष 

अमळनेर : आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर अमळनेर मध्ये शहर विकास आघाडी व शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात सरळ सरळ लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

    मतदारांना प्रलोभीत करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविल्या जात आहे. वेग वेगळ्या पद्धतीने मतदारांना आपल्या कडे कल मिळविण्यासाठी योजना राबविण्याचे आश्वासन दिले जात आहे. नुकतेच शहर विकास आघाडी तर्फे व्यापारी मेळाव्यात माजी मंत्री व आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशीत करण्यात आला.

तर आज दि ३० रोजी मा. आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर, तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या उपस्थितीत पाच वर्षांसाठीचा वचननामा उत्साहात जाहीर करण्यात आला.

“आमचा जाहीरनामा नसून नागरिकांसाठी दिलेले ठाम वचन नामा आहे आणि वचन हें पूर्ण करण्यासाठी दिले – घेतले जाते. यापुर्वीही आम्ही दिलेले वचन पूर्ण केले आहे.” असे मा.आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) – अमळनेर वचननामा : ठळक मुद्दे

) शहरासाठी स्वच्छ, शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा –

प्रत्येक घरापर्यंत योग्य दाबाने पाणी पोहोचावे यासाठी ठोस उपाययोजना.

२) अवाजवी करवाढ आटोक्यात आणणे-नागरिकांवरील अनावश्यक करभार कमी करण्याचा संकल्प.

३) १०० कोटींच्या करबोजातून नागरिकांना मुक्तता –

शहरावर लादलेला करबोजा रद्द करण्यासाठी प्रयत्न.

४) अतिक्रमण धारकांसाठी कायमस्वरूपी उपाय –

व्यवस्थित व न्याय्य पुनर्वसनासाठी धोरणात्मक योजना.

५) अतिक्रमित घरांना जमीनपट्टे

५०० स्क्वे.फु.पर्यंत विनामूल्य

५००–१००० स्क्वे.फु. : फक्त १०% रक्कम

१०००–१५०० स्क्वे.फु. : फक्त २५% रक्कम घर कायदेशीररित्या मालकाच्या नावावर करण्याची हमी.

६) प्रत्येक प्रभागात अभ्यासिका –

स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासिका उभारणे.

७) नगरपरिषद मालकीची दुकाने ९ वर्षांच्या कराराने देणे –

व्यापाऱ्यांना स्थिरता आणि सुरक्षितता.

८) लोकवर्गणी रद्द –

शहरातील विविध ठिकाणी आकारली जाणारी लोकवर्गणी पूर्णपणे बंद करण्याचे वचन.

९) नियमित करदात्यांना व्याजमाफी – घरपट्टी व पाणीपट्टी वेळेवर भरणाऱ्यांकडून घेतले जाणारे २% व्याज रद्द.

१०) नगरपरिषद दुकान हस्तांतर फी कमी करून व्यापाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणार.

११) विवाह नोंदणी पुन्हा नगरपरिषदे कडे डिजिटल बारकोडसह प्रमाणपत्रांची सुविधा उपलब्ध होणार.

१२) नवीन घर/प्लॉटवरील वर्गणी 

२% वर्गणी कमी करून ०% ते १% पर्यंत आणण्याचा निर्णय.

१३) आधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शहर स्वच्छतेला गती.

       शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या अडचणींना केंद्रबिंदू मानून तयार केलेला हा वचननामा अमळनेरमध्ये नव्या बदलांची दिशा दाखवणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!