अमळनेर न पा निवडणुकीतील एकमेव उच्च शिक्षित उमेदवार सुनील महाजन(बी.ए., एम ए.,सेट,डी. एड.,पेट परीक्षा )…प्रभाग 13 ब मध्ये उमेदवारी फक्त विकासासाठीच 

अमळनेर येथील प्रभाग क्रं 13 ब मधील इच्छुक उमेदवार स्वेच्छा सेवा निवृत्त पोलीस हेड कॉनस्टेबल सुनील महाजन हे अमळनेर निवडणुकीत सर्वांधिक डिग्री असलेले एकमेव उच्च शिक्षित उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत.

   सुनील महाजन यांनी आपल्या मुलांखतीत सांगितले की, मी पोलीस खात्यात नोकरीत सेवा निवृतीला तब्बल दहा वर्ष राहिलेले असताना आणि आठवा वेतन लागू होणार असताना ही पैसे कमवणे, हे ध्येय नबाळगता फक्त पदासाठी नाही तर, परिवर्तनासाठी उमेदवारी करतो आहे.पदं आणि पैसाच हवा असतं तर नोकरीच केली असती. सर्वसामान्य बांधव कोणावरही भरोसा ठेवतात , भूलथापांना बळी पडतात. परंतु वार्डातील छोट्या छोट्या समस्या आहेत, त्या तर काही केल्या सुटतच नाही. पाणी, गटारी, लाईट सुविधा, मच्छर, मोकाट गुरे-ढोरे, कुत्रे , कचरा यांचा साधा बंदोबस्त सुद्धा गेल्या ७० वर्षे झाले तरी सुटत नसतील तर कुठे तरी गडबड आहे. काय कारण असेल बरे? कारण आपण निवडून दिलेला उमेदवार योग्य नसेल तर,? कसा काय बदल होईल? असा प्रश्न त्यांनी उपस्थिती केला. म्हणून बदल हवा असल्यास माझ्या सारख्या स्वच्छ प्रतिमेचा लोभ नसलेला व्यक्ती ने प्रभाग क्र १३ ब मध्ये प्रतिनिधित्व करने अत्यावश्यक आहे.प्रभाग क्र १३ मधील नागरिक मला निवडून देतील यात तिळमात्र शंका माझ्या मनात नाही. मतदान प्रक्रिया फक्त नाममात्र असून मी आताच स्थानिक नागरिकांच्या मनातील विजयी उमेदवार म्हणून घोषित असल्याचे अनुभवाला मिळाले.

     प्रभाग क्र १३ मध्ये मागील काही काळा पासून विकासाच्या गंगेने पाठविरल्याचे चित्र दिसून येत आहे. गटार सह रस्त्याचा प्रश्न आवासून आहे. पिण्याच्या पाण्याची अनियमितता, वाढलेली घरपट्टी, विजेचा खेळ खंडोबां नागरिकांना सातत्याने अनुभवाला मिळतो. यां सर्व त्रासाला स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून ते सुनील महाजन यांना निवडून देऊन परिवर्तन घडविण्याच्या मानसिकतेत दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!