कैलास पाटील यांना इच्छुक उमेदवार पंकज लोहार यांचा जाहीर पाठिंबा

अमळनेर येथील वार्ड क्रमांक 1 चे इच्छुक उमेदवार पंकज भानुदास लोहार रा भवानी नगर तांबेपुरा,यांची वार्ड नं. १ – चा इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारी करायाची ईच्छा होती परंतु  वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी मताचे धुर्विकरण होऊ नये योग्य उमेदवार निवडून यावा म्हणून वार्डतील कर्तृत्वान नेतृत्व असलेले श्री कैलास नामदेवराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. पंकज लोहार यांनी त्यांचे सहकारी व प्रेम करणारे मित्रमंडळी व कार्यकर्ते याना जाहीर आवहान करत वार्डाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वानी श्री तात्यासो कैलास नामदेवराव पाटील यांच्या सोबत राहून त्याना निवडणुकीत एकमताने सहकार्य करून विजयी करावे,असे आवाहन केले आहे.

    पंकज लोहार यांनी कैलास पाटील यांच्या साठी माघार घेतल्याने कैलास पाटील यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!